मा.ना.श्री.एकनाथराव खडसे माजी महसूल मंत्री,राष्ट्रवादी नेते, महाराष्ट्र राज्य व मा.ना.श्री.रामदासजी आठवले.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते ए.एम फाऊंडेशनचे उद्घाटन करण्यात आले.
*सर्व जाती धर्मातील व्यक्तींसाठी एक सामाजिक व्यासपीठ आधार जनसामान्यांचा.*
विविध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक,गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे चेअरमन अनिलभाऊ महाजन यांनी आपला वाढता जनसंपर्क पाहता ए.एम फाउंडेशनची (AM FONDATION) निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मुंबई येथील अनिलभाऊ महाजन यांचा दिनांक १६ एप्रिल २०२१ रोजी ३५ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून ए.एम फाउंडेशनची (AM FONDATION) स्थापना करण्यात आली. *या फाऊंडेशनचा उदघाटन सोहळा मा.ना.श्री.एकनाथराव खडसे माजी महसूल मंत्री ,राष्ट्रवादी नेते, महाराष्ट्र राज्य व मा.ना.श्री.रामदासजी आठवले.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार. यांच्या हस्ते पार पडला* या फाउंडेशनचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर असणार आहे. अनिल भाऊ महाजन यांचा गोतावळा,सर्वपक्षीय मित्र परिवार, कार्यकर्ते, पदाधिकारी देशातील प्रत्येक राज्यात आहेत.त्यामुळे या फाऊंडेशनचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर सुरू असणार आहे. सर्व जाती धर्मातील व्यक्तींना तरुणांना महिलांना या फाउंडेशन मध्ये काम करता येणार आहे.समाज हितासाठी जनसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे हे एकमेव आक्रमक फाउंडेशन असेल. देशात व राज्यात जेथे जेथे अन्याय होत असेल अशा ठिकाणी अन्याय ग्रस्तांच्या मदतीला *ए.एम फाउंडेशनचे (AM FONDATION)* कार्यकर्ते धावून जातील. जात-धर्म-समाज न बघता एक माणूस म्हणून सर्वांना मदतीचा हात देणे हे या फाऊंडेशनचे काम असणार आहे.
अनिलभाऊ महाजन यांच्यावर प्रेम करणाऱ्या एकनिष्ठ राहणाऱ्यांना देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना या फाउंडेशन मध्ये सामावून घेतले जाणार आहे. देशभरातील प्रत्येक नागरिकांना या फाउंडेशनचा सभासद होता येईल. या *ए.एम फाउंडेशन (AM FONDATION) मध्ये एक आक्रमक व मजबूत संघटन निर्माण करण्यात येईल. प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, राज्य या फाऊंडेशनचे अधिकृतरीत्या संघटन असणार आहे.* प्रत्येक पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र या फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.देशातील चांगले काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचा गौरव या फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाईल.
या फाउंडेशनच्या वेगवेगळ्या संघटनात्मक आघाड्या असतील देशावर येणाऱ्या कुठल्याही संकटात व आपत्तींमध्ये संकट निवारण करण्यासाठी या संघटनेचा सहभाग असेल. या संघटनेचे सदस्यत्व तूर्तास मोफत असणार आहे. अराजकीय संघटन म्हणून या फाउंडेशनची ओळख देशात असणार आहे.सर्वपक्षीय कार्यकर्ते या फाउंडेशन मध्ये सहभागी असणार आहेत.देशात व राज्यात मी एकटा आहे असे कोणालाही वाटू नये यासाठी*ए.एम फाउंडेशनची (AM FONDATION)*सुरुवात करण्यात येत आहे.
*ए.एम फाउंडेशनचा (AM FONDATION) पूर्ण अर्थ अनिल महाजन फाउंडेशन हा आहे. ए.एम फाउंडेशनचे (AM FONDATION)मुख्य कार्यालय हे मुंबई येथे असणार आहे व विविध भागात जनसंपर्क विभागीय कार्यालय असणार आहेत. १६ एप्रिल २०२१ रोजी अनिल भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून छोट्या खानी वरील मान्यवरांच्या हस्ते या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली.
त्यावेळी मा.ना.श्री.एकनाथराव खडसे माजी महसूल मंत्री,राष्ट्रवादी नेते, महाराष्ट्र राज्य. व मा.ना.श्री.रामदासजी आठवले.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार. यांनी अनिल महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले फाउंडेशनच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.