Saturday, July 6, 2024

महाराष्ट्र काँग्रेस सहकार विभागाकडून टिळक भवन मुंबई येथे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दैदिप्यमान यश मिळवून दिल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोले यांचा सत्कार सोहळा सहकार विभागाकडून सहकार विभागाच्या प्रदेश प्रमुख ऍड शुभांगी अ शेरेकर, व प्रदेश सरचिटणीस श्री अनिल ठाकूर यानी महाराष्ट्रीतील सर्व सहकार प्रमुखांच्या मदतीने आयोजित करण्यात आला,

  
दिनांक 5 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र काँग्रेस सहकार विभागाकडून टिळक भवन मुंबई येथे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दैदिप्यमान यश मिळवून दिल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोले यांचा सत्कार सोहळा सहकार विभागाकडून सहकार विभागाच्या प्रदेश प्रमुख ऍड शुभांगी अ शेरेकर, व प्रदेश सरचिटणीस श्री अनिल ठाकूर यानी महाराष्ट्रीतील सर्व सहकार प्रमुखांच्या मदतीने आयोजित करण्यात आला, 

 यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, आमदार अभिजीत वंजारी, आमदार डॉ. प्रज्ञा सातव,आमदार धीरज लिंगाणे, प्रदेश उपाध्यक्ष संघटक व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस संघटक व प्रशासक प्रमोद मोरे तसेच या कार्यक्रमाचे आयोजक सहकार विभागाच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.शुभांगी शेरेकर आणि श्री. अनिल सुरेश ठाकुर प्रदेश सरचिटणीस आदी उपस्थित होते, 

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की केंद्रातील भाजपा सरकार त्यांच्याबरोबर असलेल्या यांना भरघोस मदत करते राज्यातील साखर कारखान्या केंद्र सरकारने मोठी आर्थिक मदत दिली सरकारच्या बगलबच्च्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यामात्र यांच्याकडे पैसे नाहीत दर 5 वर्षांनी सहकार क्षेत्रात निवडणुका घेतल्या जातात पण मागील 14 वर्षात निवडणुकांचं झालं झाल्या नाही, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेचेही निवडणुका घेतल्या जात नाहीत,
 भाजपाला जनता कंटाळली आहे निवडणुका घेतल्या तर त्यांचा प्रभाव होणार त्याची त्यांना भीती वाटते लोकसभा निवडणुकीत 165 खासदार हे 200 ते 2000 मतांनी विजयी झाले आहेत जनतेला परिवर्तन हवे आहे पण गाफील राहू नका सतर्क रहा काम करा व काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजय करा तसेच सहकार चळवळ जिवंत ठेवायची असेल तर सत्ता परिवर्तन करा असेही नाना पटवले म्हणाले.

                 Source: press release