मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांना त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय समाजसेवेमुळे आणि देशसेवेमुळे डी वाय पाटील विद्यापिठातर्फे डी. लिट. या पदवीने गौरव करण्यात आला. नेरुळ येथील डी वाय पाटील स्टेडियम मध्ये भव्य सोहळ्यात ना.रामदास आठवले यांना डॉ डी वाय पाटील यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ लिटरेचर ( डि. लीट ) या पदवीने गौरविण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याचा डी लिट पदवीने होणारा गौरव पाहण्यासाठी रिपाइं चे कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.
डी . लिट पदवी प्रदान सोहळ्याचा क्षण आपल्या डोळ्यांत साठविण्यासाठी सौ सीमाताई आठवले; कुमार जित आठवले सह संपूर्ण आठवले परिवार आप्तजन तसेच सर्व क्षेत्रातील ना. रामदास आठवले यांच्या चाहत्यांनी डी वाय पाटील स्टेडियम मध्ये प्रचंड गर्दी केली होती.
No comments:
Post a Comment