माजी मंत्री,राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या वरचे सर्व संकट दूर होण्यासाठी व आरोग्य उत्तम राहण्यासाठी आज पारोळा येथील बालाजी महाराज यांना घातले साकडे-अनिल महाजन,सामाजिक नेते (खडसे समर्थक).
अनिल भाऊ महाजन (सामाजिक नेते व खडसे समर्थक) हे आज पारोळा शहरात आले असता त्यांनी पारोळा येथील बालाजी महाराज यांच्या मंदिरात नतमस्तक होऊन नाथाभाऊ यांच्या उत्तम प्रकृती बाबत व येणारया सर्व राजकीय संकटातून नाथाभाऊ सुखरूप बाहेर पडावे यासाठी बालाजी महाराज यांना साकडे घातले. बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले. व पारोळा तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक,राजकीय कार्यकर्त्याना नेत्याना भेटी दिल्या. माजी नगराध्यक्ष पारोळा नगरपालिका चंद्रकात पाटील यांची ही यावेळी सदिच्छा भेट घेतली.
बालाजी मंदिर कार्याध्यक्ष व लोकमत वर्तमान पारोळा प्रतिनिधी सन्मानीय रावसाहेब भोसले यांनी यावेळी अनिल महाजन यांचा बालाजी मंदिरात सत्कार केला. यावेळी स्थानिक पत्रकार व कार्यकर्ते उपस्थित होते बालाजी मंदिराच्या प्रसादलया मध्ये प्रसाद म्हणून भोजनाचा आंनद ही यावेळी महाजन यांनी घेतला.
Source :Press release