एस.आर.के फाऊंडेशनचे मुंबई विविध ठिकाणी उत्कृष्ट कार्य.
आदिवासी भागात जाऊन गोरगरिबांना मदतीचा हात देत आहेत एस आर के फाउंडेशनचे पदाधिकारी - श्रीपाल जैन.
मुंबई येथे एस.आर.के फाऊंडेशन नावाची एन.जी.ओ सामाजिक स्तरावर खूप मोठे कार्य करत आहे. त्या फाऊंडेशनचे संस्थापक राजीव चोप्रा व सुशील जैन यांच्या नेतृत्वात श्रीपाल जैन व त्यांची टीम ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या पद्धतीने मदतीचा हात देत आहे. उदाहरणार्थ कुठलाही सण असेल त्यावेळी ग्रामीण भागातील लहान बालकांना मिठाई वाटप ,शालेय साहित्य वाटप ,अन्नधान्य वाटप ,अनाथ मुलांना कपडे वाटप करत ,वृद्ध महिला ज्येष्ठ नागरिकांना थंडीचे ब्लँकेट वाटप या एस. आर. के फाउंडेशन तर्फे केले जात आहे. दिनांक ०२/०१/२०२१ रोजी शहापूर येथील वरील सर्व साहित्य या फाउंडेशन तर्फे वाटप करण्यात आले व व २५/१२/२०२० रोजी मुंबई येथे हे या ठिकाणी या वस्तूंचे वाटप करण्याचा कार्यक्रम या फाउंडेशन तर्फे राबवण्यात आला.
शहापूर येथे श्रीपाल जैन, गजरा ग्रुपच्या लीला गजरा ,अर्चना शर्मा व त्यांची टीम यांनी आदिवासी मुलांना व बांधवांना गृह उपयोगी वास्तूंचे वाटप केले कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता समाजामध्ये गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे असे ध्येय उद्दिष्ट एस.आर.के फाऊंडेशनचे आहे.
No comments:
Post a Comment