माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणजे जळगाव जिल्ह्याचे हृदय – अनिल महाजन, ओबीसी नेते.
जिल्ह्याच्या हृदयाला इजा पोहचवण्याऱ्यांना आगामी काळात जळगाव जिल्ह्याची जनता माफ करणार नाही. ही काळ्या दगडावरची सफेद रेघ आहे.
राजकारणात पडझडही सुरूच असते. सत्तेचा अमर पट्टा आयुष्यभर कोणीही बांधून येत नाही. पण जनतेच्या मनात निर्माण केलेले स्थान हे कायम असते. जळगाव जिल्हा म्हणजे हा खान्देशाचा एक मुख्य पाया आहे. या जिल्ह्याने या देशाला व जगाला अनेक महापुरुष दिले आहे. उदाहरणार्थ बहिणाबाई चौधरी व बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे अशा थोर व्यक्तीची जडणघडण ही जळगाव जिल्ह्यात झाली आहे. साने गुरुजीची कर्मभूमी म्हणुन जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. राजकारण हे विकास कारणासाठी करावे. ही वृत्ती डोळ्यासमोर ठेवून गेले ४० वर्षे एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यात कार्य करत आहेत. ते सत्तेत असताना जळगाव मधील अनेक मोठे प्रकल्प उदयास आले. देशात कुठेही जळगाव जिल्ह्याचे नाव निघाले असता सर्वात प्रथम एकनाथराव खडसे यांचं नाव सर्वांच्या तोंडावर असते.
राजकारणात नेता होणे हि मोठी गोष्ट नाही. परंतु राजकारणात लोकनेता होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. वंजारी समाजातून आलेले एक लोकनेता गोपीनाथ मुंडे साहेब होऊन गेले आणि त्यांना मानणारे दुसरे लोकनेता हे एकनाथ खडसे आहेत. प्रत्येकाला आपलेसे करणारे नेतृत्व प्रत्येकाचा सुखदुःखात आवर्जून उपस्तिथ राहणारे अडचणीच्या काळात प्रत्येकाला मदत करणारे नाथाभाऊ हे जनतेच्या मनात कायमस्वरूपी लोकनेते आहेत. राज्यात सर्वपक्षीय वरच्या फळीतील नेते मंडळी एक लोकनेता म्हणून एक व्यक्ती म्हणून सर्व जण आजही नाथाभाऊंवर प्रेम करतात तसेच त्यांचा आदर करतात.
जळगाव जिल्ह्याचे हृद्य असलेले एकनाथ खडसे यांना गेल्या १० वर्षांपासून काही संकोचित विचार सरणीचे राजकीय नेते किंवा मंडळीं पाठीमागून वार करून या जळगाव जिल्ह्याच्या हृदयाला इजा पोहोचवण्याचे काम करत आहे. यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यचा विकास थांबला आहे. कारण दूरदृष्टी व्हिजन असलेला दुसरा नेता सध्यातरी जळगाव जिल्ह्यात नाही. आजही जनतेच्या मनातं नाथाभाऊ बद्दलच स्थान कायम आहे. आणि योग्य वेळ आल्यावर .नाथाभाऊंच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी मिळेल.पक्ष कोणताही असो पण लोकनेता म्हणून यांना मानणारा जळगाव जिल्हा आजही त्या दिशेने वाटचाल करणारा आहे. आगामी काळात जिल्ह्याचा विकासासाठी नाथाभाऊ हे यशस्वी नेतृत्व ठरू शकते. संकोचित विचार सरणीचे राजकारण करणाऱ्या व्यक्तींना जळगाव जिल्ह्याची जनता हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.
No comments:
Post a Comment