मुंबई :
जागतिक महिलादिनानिमित्त तृतीयपंथी आणि वेश्या व्यावसायिक मुलांसाठी सामाजिक काम करणाऱ्या तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांचा जीवन प्रवास उलगडणारे 'गौरी -द अर्ज टू फ्लाय' पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. 'राईट क्लीक पब्लिकेशन्स' द्वारे प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण आज शुक्रवारी (८ मार्च) जागतिक महिलादिनानिमित्त प्रेस क्लब, मुंबई मध्ये झाले.
वेश्या व्यावसायिक महिलेची मुलगी दत्तक घेऊन मातृकर्तव्य करणाऱ्या प्रथम तृतीयपंथीय ठरलेल्या गौरी सावंत यांचा जीवनप्रवास, संघर्ष, शोध पुस्तकात मांडला आहे. त्यांच्या 'नानी का घर' या स्वयंसेवी संस्थेतील त्यांच्या 'नानी' या व्यक्तिरेखेचे पैलू समाजापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. २००१ मध्ये गायत्रीला दत्तक घेतल्यानंतर 'नानी का घर' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सेक्स वर्कर्स, जन्मतः तुतीयपंथी असणाऱ्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करण्याचे, त्यांना शिक्षण देणे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे काम गौरी सावंत करत आहेत.
गौरी सावंत यांना आलेल्या समस्या, आव्हाने व त्यांनी दिलेला त्यासाठीचा लढा याची माहिती पुस्तकाद्वारे उलगडणार आहे. पुस्तकाची संकल्पना रचना शाह यांची आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १२ मे २०१९ ला मातृदिनी होणार असल्याची माहिती, युवा लेखक रिदम वाघोलीकर यांनी प्रेस क्लब, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुणे निवासीत २५ वर्षीय तरुण लेखक आणि 'अप्पलाऊड' स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक रिदम वाघोलीकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. यांनी अनोख्या ग्रामोफोन आकारात मुद्रीत झालेले जगातील पहिले 'स्वरलता -रिदमीक रेमिनीसेस ऑफ लता दीदी' हे लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक लिहिले आहे. तसेच 'स्वरमंडळ (इंडियन हार्प) आकारातील किशोरी आमोणकर यांच्यावरील 'द सोल स्टीरिंग व्हॉइस गानसरस्वती किशोरी आमोणकर' पुस्तक लिहिले आहे. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या महात्मा गांधी सन्मान करणारे सर्वात तरुण भारतीय आहेत.
पत्रकार परिषदेला तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, युवा लेखक रिदम वाघोलीकर संबोधित केले.
'एच आय व्ही झालेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या ५ वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले आणि मातृत्वाचा प्रवास सुरु झाला. गायत्रीमुळे मला आईपण मिळाले. आणि 'नानी का घर' स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते पुढे कार्यरत आहे', असे तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
'रिदम वाघोलीकर यांनी हे पुस्तक लिहुन माझी इच्छापूर्ती केली आहे. पुस्तकामुळे समाजात उपेक्षित राहिलेल्या माझ्यासारख्या समदुःखी तृतीयपंथी, वेश्या व्यावसायिक आणि जन्मतः तृतीयपंथी असणाऱ्या मुलांना (हर्माफ्रोडाईट) न्याय मिळणार आहे. मला अतिशय आनंद वाटतो की, तृतीयपंथी समाजाला डावलले जाते अशी समाज प्रवृत्ती बदलण्यास या पुस्तकाच्या माध्यमातून मदत होणार आहे.
'मुंबईला आले आणि स्त्री म्हणून अभिव्यक्ती जपत आले. हिंदुस्तानात जेंडर इक्विलिटी अजून नाही. लग्न व्हावे ही माझीही अपेक्षा होती; पण लैंगिकता, भूक यांच्यापेक्षा जबाबदारी जास्त कळत गेली. मग स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम सुरु झाले. समाजात उपेक्षित राहिलेल्या तृतीयपंथी वर्गाची मी माऊली होऊन कार्यरत राहणार आहे', असे देखील त्या म्हणाल्या.
पत्रकार परिषदेत बोलताना लेखक रिदम वाघोलीकर म्हणाले, 'समाज 'स्त्री'ला मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवून एका मर्यादेत राहण्यास भाग पाडत आहे. यामुळे तीला लढत राहावे लागते. गौरी सावंत एक अशीच योद्धा आहे. तिचा आजपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रशंसनीय आहे. पुस्तकातून तृतीयपंथीयांच्या समस्या, आव्हाने, गरजा यांची उकल करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात लढा देणाऱ्या गौरी सावंत तृतीयपंथीयांची आई आहे. तीने नारीशक्ती चा वापर करून अनाथ गायत्रीला तस्करीपासून वाचवून दत्तक घेतले. गायत्रीला आपल्या निस्वार्थ आणि सांत्वनदायक पंखांची उब दिली. तेंव्हापासून ती 'सेक्स वर्कर' च्या मुलांसाठी आणि जन्मतः तृतीयपंथी मुलांसाठी सतत कार्यरत आहे. अशा योद्धेचा जीवन प्रवास समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी हे पुस्तक लिहिण्याचे योजिले. समाजात खरे बदल घडतात जेंव्हा गौरी सारखे सुधारक जन्माला येतात.'
'आम्हाला आशा आहे की हे पुस्तक लाखो लोकांपर्यंत पोहोचेल. पुस्तकाद्वारे जो गौरी आणि आमच्या कुटुंबाला मदतीचा हात देईल आणि प्रवासाचा भाग बनू शकेल असे एकत्र येण्यास मदत होऊ शकेल, असे देखील रिदम वाघोलीकर म्हणाले.
------------------------
About Nani Ka Ghar NGO
-------------------
After adopting 5-year-old Gayatri in 2001, Gauri Sawant has established 'Nani Ka Ghar': a home where children of sex workers and hermaphrodite children provided with shelter, food, healthcare, and basic education. At this Mumbai-based abode she aims to not only shower children with love and care, but also impart basic education and healthcare. Anyone below the age of 18 is welcome here. 'Naani ka Ghar' was born from this thought. What can be more welcoming for a child than his or her grandmother's house: a place where every child is pampered and loved the way they deserve to be. While the land for the home has been donated, Gauri has already put in the money she won on Amitabh Bachchan’s quiz show Kaun Banega Crorepati. She is currently raising more funds for the home through crowdfunding.
Nani ka Ghar seems to have become a symbol of Gauri’s purpose in life. She is dedicating all her efforts to make this safe haven for children a reality. Gauri believes she provided a secure future and better opportunities to these children by providing them with love, affection, safety, healthcare, and education, helping them live a dignified life with options.
----------------------
More about Rhythm Wagholikar :
-----------------------------------
Rhythm Wagholikar is an Indian Author, Talk show host and Social Activist. He is renowned for his contribution towards legends of the art and film world. Having penned several books to his credit on The Nightingale of India Bharat Ratna Awardee and legendary singer Smt.Lata Mangeshkar, Hindustani Classical vocalist Gaanasaraswati Padma Vibhushan Kishori Amonkar and other epics of the music fraternity. Rhythm has made a distinctive mark by capturing these Sagas in a never thought before style.
Rhythm is also known for his social activities and motivational work. He has worked with Gauri Sawant, eminent transgender social Activist for the rescue of abandoned girls and protecting their rights towards a happy childhood.
His book ‘Swarlata-Rhythmic Reminisces of Lata Didi’, was the first book in the world to be intricately designed and printed in the unique shape of a gramophone record, received various accolades and praises globally. The limited edition book comprises of anthology of 38 stalwarts of the Indian Subcontinent, some prominent ones including Amitab Bachchan, Pandit Hariprasad Chaurasia, Shiv Kumar Sharma, Rekha, Dilip Kumar, Madhuri Dixit ,Rekha and many others.
His book The soul Stirring Voice- Gaanasaraswati Kishori Amonkar is another record for its unmatched shape of an Indian Harp and distinctive visual appeal.The 25 year old has managed to present his work to - Former president of India Smt.Pratibha Patil, President Pranab Mukherjee, Amitabh Bachchan, and several stalwarts nationally and Internationally. In his writing métier he has worked with celebrated luminaries , naming few Thumri Doyen of India Smt.Girjia Devi, Pandit Jasraj, Pandit Birju Maharaj, Nitin Gadkari, Raj Thackrey, Sindhu Tai Sapkal, Vaijantimala Bali and many others.He is the youngest Indian recipient to be conferred with the prestigious Mahatma Gandhi Samman, for his dedication and contribution to worthy causes for keeping the flag of India high at the House of Commons British Parliament, London.
He is also the founder of Creating Possibilities, a brand inspired to inspire people, where he along with his counterpart Rachana Shah host talk shows and interviews on Public Platforms across the length and breadth of the country.
His guests lists include some prominent politicians, social workers, epics of the art and film world to legendary connoisseurs of music. Rhythm Wagholikar has also served the Public Relations Council of India YCC as the Chairman, Pune from 2016-2018. He has received two awards from the Institute of International Spirituality (International Spirituality Market). Also received the 'Ruwa Entrepreneur award' have got at the 'Asean Thai Indian Business Leadership' Conference. 'Art Gaurav National Award', 'International Achievers' Award' (Dubai), 'Savitribai Phule National Award', 'Femina Most Powerful of the Year 2018' award at the hands of Amrita Fadnavis
No comments:
Post a Comment