Sunday, June 2, 2019

केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सोमवार दि 3 जून रोजी पदभार स्वीकारणार



दिल्ली दि.2 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या मंत्रिमंडळात सलग दुसऱ्यांदा  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी नियुक्ती झालेले ना रामदास आठवले हे सोमवार  दि. 3 जून रोजी दुपारी 12.30 वाजता  केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. केंद्रियमंत्रीमंडळात सलग दुसऱ्यांदा केंद्रियराज्यमंत्री पदी निवड झालेले पाहिले रिपब्लिकन नेते ठरण्याचा बहुमान ना रामदास आठवले यांना लाभला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा प्रसार संपूर्ण भारतात ना रामदास आठवले यांनी केला आहे. रामदास आठवलेंच्या रूपाने  डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा खरा वारसदार अनुयायाचा केंद्रियमंत्रीमंडळात दुसऱ्यांदा समावेश झाल्याने देशभर  आनंद जल्लोष साजरा करण्यात येत आहे. देशभरातून ना रामदास आठवले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सोमवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ना रामदास आठवले मंगळवार दि. 4 जून रोजी मुंबईला रवाना होणार असून तेथे ना आठवलेंचे रिपाइं तर्फे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

             
           

No comments:

Post a Comment