मुंबई, 24 एप्रिल
राज्यातील सेवा कार्यात महाराष्ट्र भाजपाने एक मोठा टप्पा गाठल्यानंतर आता पुढच्या काळातील नियोजन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील भाजपाच्या आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांशी संवाद साधला. पुढच्या काळात आरोग्यसेवांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे त्यांनी आवाहन केले.
या संवादसत्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते. भाजपाचे सेवाकार्य सध्या 610 मंडळांमध्ये तयार जेवण किंवा अन्नधान्य वितरणाच्या माध्यमातून 67 लाख नागरिकांपर्यंत पोहोचले आहे. 12.50 लाख मास्क, 7.25 लाख सॅनिटाईझर्स वितरित करण्यात आले. अन्य राज्यातील महाराष्ट्रात राहणार्या 1.50 व्यक्तींना महाराष्ट्र भाजपातर्फे लागणारी मदत उपलब्ध करून देण्यात आली. या सेवाकार्याचे उद्दिष्ट गाठले असताना आता आगामी काळात वैद्यकीय सुविधांवर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. बंद असलेले रूग्णालय सुरू करण्यासाठी मदत करणे, कोरोना व्यतिरिक्त अन्य उपचारांची गरज असलेल्यांना ते पुरविणे, यासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी प्रारंभ केलेल्या एका हेल्पलाईनचा शुभारंभ आज देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना डॉक्टर्स, विलगीकरण सेंटर्स, रूग्णालये, कोरोना व्यतिरिक्त रूग्णालये, पोलिस स्थानक, रेशन दुकान, इत्यादी सेवांसाठी 7021584358, 8879774368 हे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment