Sunday, April 17, 2022

साकेडी महामाता भिमाई नगर येथे भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत महामाता भिमाई रामाजी आंबेडकर स्मारक साकेडी यांच्या विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी

साकेडी महामाता भिमाई नगर येथे भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत महामाता भिमाई रामाजी आंबेडकर स्मारक साकेडी यांच्या विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी 
भारतीय बौद्ध महासभा फलकाचे उद्घाटन आद विजिन गोविंद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्तीची स्थापना आयु  सागर संदेश जाधव ( मुलगा ) सौ. समिधा सागर जाधव ( सुन ) यांच्या हस्ते करण्यात आली. सामुदायिक त्रीशरण  पंचशील भिम स्तुती दीप प्रजवलीत पुष्प वर्षाव करण्यात आला. उपस्थित असणारे सर्व बौद्ध बांधव यांना धम्म पुस्तके वाटप करण्यात आले तसेच भारतीय बौद्ध महासभा विभागाचे पालक मंत्री महा सचिव  आदरणीय प्रभाकर जाधव ( घावणळेकर ) जिल्हा सचिव आदरणीय दीपक कांबळे ( सांगवेकर ) तालुका कणकवली पदाधिकारी आदरणीय गोपी जानवलकर आणी त्यांचे सहकारी या कार्यक्रमाला येऊन भेट दिली. भिमाई स्मारकाचे निर्माते आदरणीय संदेश सावळाराम जाधव ( साकेडीकर ) यांनी धम्म पुस्तके प्रकाशन करून पंचशील पट्टी ने स्वागत केले तसेच साकेडी गाव चे ग्रामपंचायत सरपंच रीना राने आणी भाऊ तांबे साहेब यांनी महामाता भिमाई स्मारकला भेट दिली तेव्हा त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अश्या पद्धतीनी साकेडी बौद्ध वाडी मधील महामाता भिमाई रामजी आंबेडकर स्मारका मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वंदन करण्या साठी आलेले सर्व उपासक उपासिका या सर्वांना धम्म पुस्तके वाटप केले तसेच पंचशील पट्टी ने स्वागत केले.संध्याकाळी मिरवणूक जय घोषात काढून छत्रपती शिवाजी महाराज यांना हार मेणबत्ती प्राजवलीत करून त्यांना वंदन जयजयकार करण्यात आला. तसेच लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्यांना आयु संदेश सावळाराम जाधव अध्यक्ष महामाता भिमाई रामजी आंबेडकर यांच्या विद्यमाने भेटवस्तू देण्यात आले तसेच या कार्यक्रमांसाठी आवर्जून मुंबई वरून उपस्थित आयु.संजय गंगाराम जाधव ( चित्रपट दिग्दर्शक ) कलाकर यांनी संपूर्ण कार्यक्रम संपन्न होईपर्यन्त बरोबरीने साथ दिली तसेच आयु. मिलिंद जाधव यांनी स्मारकाची व्यवस्था पाहणी चांगल्या प्रकारे केली तसेच गावशाखा साकेडी अध्यक्ष संदीप जाधव सेक्रटरी प्रशांत जाधव खजिनदार मनीष जाधव आणि साकेडी मधील जागृती महिला मंडळ यांनी आलेल्या सर्व बौद्ध बांधवासाठी अल्पोपहार  करंजे वाटप केले तसेच गावशाखा साकेडी यांच्या अंतर्गत महामाता भिमाई स्मारकमध्ये उत्कृष्ट असा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे सर्व आयोजक * सागर संदेश जाधव , समिधा सागर जाधव , तुफान संदेश जाधव , आकाश मिलिंद जाधव , मयूरी मिलिंद जाधव , संघमित्रा संदेश जाधव , विश्रांती जाधव , आम्रपाली जाधव तसेच आमचे छोटे बाबासाहेब आंबेडकर सुमेध मिलिंद जाधव आणि सर्व मित्र मंडळ सहपरिवार * या सर्वांनी‌ कालकथित आद सावळाराम गुणाजी जाधव यांना दोन मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली आदरांजली वाहिली सरणंत्तंय घेऊन कार्यक्रम  यशस्वी केला 

 🙏🏻आभार धन्यवाद जयभिम 🙏🏻

No comments:

Post a Comment