मुंबई, 27 : महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या शेवटच्या दिवशीच्या रॅलीत, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे सामील झाले. यावेळी 'राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित असून महाराष्ट्रात शिवसेना- भाजप- आरपीआय महायुतीला भरभरून मते मिळतील" असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तर " गेल्या महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराच्या झंजावातामुळे आम्ही जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचलो असून विजय निश्चित आहे" अशी प्रतिक्रिया उमेदवार राहुल शेवाळे यांनी दिली. यावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार सदा सरवणकर, प्रकाश फातर्फेकर, तुकाराम काते, महिला विभाग संघटिका रिता वाघ, श्रद्धा जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, आरपीयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, नागसेन कांबळे, चंद्रशेखर कांबळे,सौ. कामिनी राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, हे सुमारे 4 वाजता दादर परिसरात, राहुल शेवाळे यांच्या रॅलीत सहभागी झाले. यावेळी, " ही निवडणूक गल्लीची किंवा केवळ शहराची नसून , देशाची निवडणूक आहे. त्यामुळे एनडीएला जास्तीत जास्त जागा मिळून शिवसेना- भाजप- आरपीआय महायुतीचे सरकार देशात येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
दक्षिण- मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांची भव्य रॅली सकाळी 10 वाजताच्या सुमारास ट्रॉम्बे कोळीवाडा येथून सुरू झाली. शेकडो बाईक आणि चारचाकी वाहने घेऊन महायुतीचे कार्यकर्ते आणि समर्थक या रॅलीत सहभागी झाले होते. ट्रॉम्बे येथून निघालेली ही रॅली देवनार, चेंबूर, चुनाभट्टी, सायन सर्कल, गुरू त्याग बहाद्दूर नगर, अंटोप हिल्स, वडाळा, महेश्वरी उद्यान, खोदादाद सर्कल, परेल टी टी, एल्फिन्स्टन, प्रभादेवी, सेनाभवन, माटुंगा लेबर कॅम्प येथून धारावी येथे दाखल झाली. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे ही रॅली मतदारसंघातील नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली. अखेर धारावी येथे या रॅलीची सांगता झाली.
No comments:
Post a Comment