Tuesday, August 6, 2019

समाजसेवक डॉ. अनिल काशी मुरारका यांना प्रतिष्ठित 'भारत गौरव पुरस्कार २०१९' प्राप्त



समाजसेवक डॉ. अनिल काशी मुरारका यांना नुकतेच लंडन मध्ये २०१९ चा भारत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा हाऊस ऑफ कॉमन येथे पार पडला असून त्यांना त्यांच्या देशाची उत्कृष्ट सेवा करण्याबद्दल आणि उत्कृष्ट वैयक्तिक यशासाठी सन्मानित करण्यात आले. 

डॉ. अनिल कशी मुरारका  नेहमीच आपल्या मनाचे ऐकत, आपल्या देशात कोणत्याही प्रसिद्धी शिवाय समाजसेवा क्षेत्रात निरंतर कार्यरत आहेत. ते सांगतात की, "जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या कार्यासाठी विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मानित केले जाते तेव्हा तो आनंद, तो सन्मान वेगळाच वाटतो."

२०१५ मध्ये डॉ. अनिल काशी मुरारका यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी  सामाजिक जागरूकता संस्था अँपल मिशनची  स्थापना केली. त्यांच्या काही अलीकडील मोहिमांमध्ये आदिवासी महिलांना सॅनिटरी पॅडचे वितरण करणे, अ‍ॅसिड हल्ला वाचलेल्यांना मदत करणे; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स डे आयोजन; उन्हाळ्याच्या उष्णतेपासून थोडासा आराम मिळावा यासाठी स्टेशन जवळ प्रवास करण्याऱ्या प्रवाश्यांना टोप्या, लिंबू पाणी वितरित करणे, मालवणी येथील झील इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देणे असे निरनिराळे उपक्रमांचा समावेश आहे.

'भारत गौरव पुरस्कार २०१९' हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. अनिल काशी मुरारका सांगतात की, "पुरस्कारापेक्षाही जास्त, समाजासाठी आपण जे कार्य करत आहोत त्यासाठी हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दलची भावना ही अमूल्य आहे! मी जे करतो ते पाहून अजून काही लोक निःस्वार्थपणे योगदान देण्यास पुढे आले तर मी माझ्या मोहिमेत यशस्वी झालो असे मानतो."

No comments:

Post a Comment